धुळे : शहरातील एका LIC एजंट कडे कोट्यवधींचं घबाड सापडल्याची माहिती समोर येतेय. धुळे पोलिसांच्या मेहनतीला मोठं यश आलं असून या एजंटकडची कोट्यवधी रुपयांची संपत्ती धुळे पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस मागच्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी 3 दिवस धाडी टाकल्या. या कारवाईमध्ये पोलिसांना 15 कोटींची मालमत्ता मिळाली आहे. आरोपी राजेंद्र बंबविरुद्ध धुळे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.