अखेर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल; औरंगाबाद पोलिसांची कारवाई

मंगळवार, 3 मे 2022 (20:52 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद पोलिसांनी राज यांच्या १ मे रोजीच्या जाहीर सभेसाठी अटी-शर्थींसह परवानगी दिली होती. मात्र, दिलेल्या अटी पाळल्या नाहीत. त्यांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी राज यांच्यासह या सभेचे आयोजक असलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
१ मे रोजी राज यांची जाहीर सभा औरंगाबादमध्ये झाली. या सभेत राज यांनी धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण होईल, असे कुठलेही भाष्य करु नये, असे पोलिसांनी बजावले होते. मात्र, राज यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. तसेच, ३ मे पर्यंत भोंगे हटवावेत. अन्यथा त्याच मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा राज यांनी या सभेत दिला. याद्वारे राज यांनी पोलिसांच्या अटी-शर्थींचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राज यांचे संपूर्ण भाषण ऐकून पोलिसांनी अखेर सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
– ध्वनी प्रदूषण नियम पाळणे गरजेचे.– कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली जावी– १ मे हा महाराष्ट्र दिन असल्याने धर्म, प्रांत, वंश, जात अशा कोणत्याही मुद्द्याविषयी वक्तव्य करु नये.– कोणत्याही व्यक्तीचा, समुदायाचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी.– सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी.– सभेपूर्वी व नंतर गाड्यांची रॅली, मिरवणूक काढता येणार नाही.– लहान मुलं, महिला, वृद्ध यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.– सामाजिक सलोखा बिघडले असे वर्तन करु नये.– सामाजिक वातावरण बिघडेल अशा घोषणा लोकांनी देऊ नयेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती