Vishal Kusum Love Story: अखेर विशालने कुसुमला हे उत्तर दिले !

मंगळवार, 26 एप्रिल 2022 (13:11 IST)
सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होऊ शकते. इंटरनेटवर कधी आणि काय व्हायरल होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही? सध्या इंटरनेटवर 10रुपयांच्या  नोटांवर एक विचित्र प्रेमाचे मेसेज येत आहे. काही वर्षांपूर्वी 10 रुपयांच्या नोटेवर 'सोनम गुप्ता बेवफा है' असा संदेश आल्याने इंटरनेटवर खळबळ उडाली होती.

त्यानंतर 10  रुपयांच्या नोटांवर विशाल नावाच्या तरुणाच्या प्रेयसीने एक मेसेज लिहून विशालसाठी पाठवले  होते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या प्रकरणात आता पुन्हा एकदा  10 रुपयांच्या नोटावर प्रियकराने प्रेयसीला लिहिलेला रिप्लाय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन्ही नोट्सवर लिहिलेले मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर करत आहे. 
 
नोटांवर काहीही लिहिले गुन्हा आहे. जगातील चलनी नोटा हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. पण भारतातील लोक एकमेकांना संदेश देण्यासाठी चलनी नोटांचा वापर करत आहेत. आता नोटांवर प्रियजनांसाठी लिहिलेला मेसेज पाहता हेच जाणवते. ही काही पहिली वेळ नाही, कारण याआधीही नोटवर लिहिलेले मेसेज व्हायरल झाले आहेत. 
 
कुसुमचे 10 रूपयांच्या नोटांवर तिच्या प्रियकर विशालसाठी लिहिलेले मेसेज मोठ्या प्रमाणात  व्हायरल झाले होते.हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर झाला आणि कुसुमच्या मनाची गोष्ट तिचा प्रियकर विशालपर्यंत पोहोचली. यानंतर विशालने कुसुमच्या 10 रुपयांच्या नोटेवर लिहिलेल्या मेसेजला  उत्तर दिले आहे.कुसुम आणि विशालच्या व्हायरल झालेल्या मेसेज वर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यासोबतच यूजर्स फनी मीम्सही शेअर करत आहेत. कुसुमचा मेसेज वाचून विशालने दिलेला रिप्लायही इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. 
 
विशालनेही कुसुमला10 रुपयांच्या नोटेवर लिहून प्रतिक्रिया दिली आहे. विशालने लिहिले आहे की, 'कुसुम, मला तुझा मेसेज आला आहे, मी तुला घ्यायला येईन, मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझा विशाल. आता हा मेसेजही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
या पूर्वी कुसुमने 10 रुपयांची नोटांवर लिहिले होते, 'बिशाल, माझे लग्न 26 एप्रिलला आहे. मला इथून घेऊन जा मी तुझ्यावर प्रेम करतो तुझी प्रेयसी कुसुम. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती