जनतेने यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी : टोपे

शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (08:02 IST)
दिल्ली आणि पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या राज्यात दिवाळीत फाटके फोडण्यास बंदी घातली आहे. थंडीच्या वातावरणात फटाक्याच्या प्रदुषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने या राज्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेनेही यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. 
 
“फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडे आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. “फटाक्यांच्या धुरात टॉक्झिसिटी खूप असते. थंडीमुळे तो धूर वर जाऊ शकणार नाही. त्यामुळे श्वसनाला अधिक बाधा निर्माण होऊ शकते. यासंदर्भात अधिक काळजी घेतलेली बरी आहे, यासाठीच दिवाळीपूर्वीपर्यंत हा नियम लागू करण्याचा माझा आग्रह राहील”, असे राजेश टोपेंनी सांगितले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती