पराभव साजरा करण्याचं नशीब कुणाचं असतं? धनंजय मुंडे यांनी माझ्यावर काय टीका मला कल्पना नाही पण पराभव साजरा करण्याचं नशीब कुणाचं असतं? तो साजरा करण्याची खिलाडू वृत्ती माझ्यात आहे. इतके दिवस सगळे म्हणत होते ताई घराच्या बाहेर पडत नाहीत. आता बाहेर पडले तर म्हणत आहेत की पराभव साजरा केला. एखादी पराभूत व्यक्ती जर नांदेडपासून आठ जिल्ह्यांमधलं स्वागत स्वीकारत येत असेल आणि त्याचा एवढा मोठा मेळावा होत असेल तर ही पुण्याईच म्हणेन मी असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.