याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात केल्यानंतर मुलींचा मृतदेह आज सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या प्रकरणात असलेले आरोपी यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आ.निलेश लंके दुपारपासून जवळा गावात उपस्थित होते.त्यांनी पीडित कुटुंबियांना आधार देत न्याय मिळे पर्यंत आपण शांत बसणार नाही असे सांगितले. दरम्यान पोलिसांनी प्राथमिक अहवालानुसार मुलीचा मृत्यू हा गुदमरुन झाला असल्याचे सांगण्यात आलेले आहे.मात्र त्याच बरोबर इतर अनेक बाबी बाबत अहवाल नाशिक येथून यामधून आल्यानंतर अनेक बाबी समोर येणार आहेत.यानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारनेर पोलीस ठाण्यामध्ये आज सायंकाळी हत्या आणि अत्याचार याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.