कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार आणि बँकेतील 80 कर्मचाऱ्यांना क्लिनचीट देण्यात आली. या क्लिनचीटचा विरोध करण्यासाठी ईडी कडून मध्यस्थी अर्ज दाखल करण्यात आला असून अजित पवार यांचे नाव आरोपींच्या यादीत असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणात काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शहाणे 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यात न्यायालयात क्लोजर अहवाल सादर केला या मध्ये साखर कारखाने कर्जवाटप विक्रीमुळे बँकेला कोणतं ही नुकसान झालं नसून पुरावे ही नसल्याचे म्हटलं होत. या प्रकरणी ईडीने विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या क्लोजर अहवालामुळे आमच्या तपासावर परिणाम होण्याचे ईडीचे म्हणणे आहे.