BJP पदाधिकारी औरंगजेबाच्या कबरीवर; काँग्रेसनं समोर आणला फडणीसांसोबतचा 'तो' फोटो सचिन सावंत यांनी यावरुन एक सवाल उपस्थित केला आहे

मंगळवार, 17 मे 2022 (08:34 IST)
औरंगाबादमध्ये पक्षाचे नेते अकबरुद्दी ओवैसी यांच्या दौऱ्यानंतर राज्यात मोठा वाद सुरु झाला आहे. ओवैसींनी एका कार्यक्रमासाठी हा दौरा केला होता. या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यापूर्वी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरती माथा टेकवला. यामुळे राज्यात एकच गोंधळ निर्माण झाला असून, त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. भाजपने (BJP) या प्रकरणावरुन शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच राज्यातील महाविकास आघाडीवर देखील भाजपने टीका केली आहे. त्याला आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे.
 
सचिन सावतं यांनी याप्रकरणावर बोलताना सांगितलं की, "औरंगजेबाची कबर भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मोदी सरकार प्रवेश नियंत्रित करु शकते वा बंदीही घालू शकते. मोदी सरकार ओवैसीविरोधात तक्रार का नोंदवत नाही?" असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. तसंच "भाजपाचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष खालीद बाबू कुरेशी फडणवीस साहेबांनी वर्णिलेले कार्य करताना पहा" असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजप नेते खालीद बाबू कुरेशी यांचा औरंगजेबाच्या कबरीवरील एक फोटो आणि फडणवीस यांच्या सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती