राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाचे वॉरंट

मंगळवार, 7 जून 2022 (07:50 IST)
राज ठाकरे कोर्टात हजर राहिल्यास त्यांचे वॉरंट रद्द करण्यात येईल
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. ८ जून रोजी राज ठाकरेंना हजर राहायचे आहे. शिराळा कोर्टाकडून आता हे वॉरंट मुंबई पोलिसांना प्राप्त झालं आहे. राज ठाकरे कोर्टात हजर राहिल्यास त्यांचे वॉरंट रद्द करण्यात येईल अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे. राज ठाकरेंविरोधात शिराळा कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. वारंवार कोर्टात गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने वॉरंट जारी केले. 
 
2008 मधील सांगलीतील एका प्रकरणाबाबत राज ठाकरे न्यायालयात हजर  राहत नसल्याने त्यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. राज ठाकरे यांना 8 जूनपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण -
 
राज ठाकरेंच्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेमुळे कल्याणमध्ये २००८ रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये राज ठाकरेंवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. परंतु या अटकेनंतर महाराष्ट्रात मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. यामध्ये परळी आणि सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सांगलीतील शिराळा न्यायालयाकडून राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. जामीन मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी न्यायालयात हजेरी लावली नाही. सतत गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई करण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती