मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

शनिवार, 7 मे 2022 (08:11 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात दुसरे अजामीनपात्र वॉरंट जारी झाले आहे. जामीन घेतल्यानंतरही न्यायालयात सतत गैरहजर राहिल्याने परळी न्यायालयाने हे आदेश काढले आहेत. यापर्वी न्यायालयाने १० फएब्रुवारी रोजी अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्यात म्हटले होते की १३ एप्रिल पर्यंत न्यायालयात हजर रहावे. मात्र, राज हे न्यायालयासमोर हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट दुसऱ्यांदा जारी केले आहे.
 
दरम्यान, सांगली न्यायालयानेही राज यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट यापूर्वीच जारी केले आहे. त्यामुळे परळी न्यायालयाचे हे वॉरं दुसरे आहे. २००८मध्ये राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्याचे मोठे पडसाद राज्यभरात उमटले होते. काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाले होते. परळीतील धर्मापुरी येथे एसटी बसवर दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन यामुळे राज यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं. त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. त्याचअंतर्गत आता राज यांना अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती