पुणे शहराला पाणी पुरवठा करणा-या पर्वती, लष्कर, वडगाव, एसएनडीटी-वारजे आणि होळकर पंपिंग स्टेशनची देखभाल-दुरुस्तीची कामे होणार आहेत. गुरुवारी (दि.२९) रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा संपूर्ण बंद राहणार असून, शुक्रवारी देखील संपूर्ण शहरात कमी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले. पर्वतीच्या नवीन जलकेंद्रासाठी महावितरणतर्फे वीज पुरवठ्याचे काम करणार आहेत. वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे, पर्वती, नवीन होळकर या जलकेंद्रांतील पंपिंग स्टेशनमध्ये ही दुरुस्तीची केली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
खालील सर्व भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद :
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र :
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र ४२, ४६ कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र.