मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणं लावण्याचा या सरकारचा हेतू - जितेंद्र आव्हाड

मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणं लावण्याचा या सरकारचा हेतू आहे, असा आरोप आ. जितेंद्र आव्हाड यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मुळात ज्या समाजांना आरक्षण आहे, त्यांना तरी ते मिळतंय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओबीसी समाजाने खुल्या वर्गात जायचंच नाही असा अलिखित नियम या सरकारने केला आहे. 
 
खुला वर्ग म्हणजे समाजातील सर्व घटकांना खुला असलेला वर्ग..लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्रात ५४ टक्के ओबीसी आहेत आणि २५ टक्के एससी, एसटी आहेत. ७५ टक्के लोकसंख्या असलेल्यांना ५० टक्क्यांमध्ये कोंबण्याचं काम जर हे सरकार करणार असेल तर हा अन्याय आहे जो सरकार एमपीएससीच्या माध्यमातून करत आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. ओबीसी असणाऱ्यांना खुल्या वर्गातून अर्ज करता येणार नाही असा नियम एमपीएससीतून करण्यात आला आहे. एकंदरीतच आरक्षणाबद्दल संशयास्पद भूमिका घेणारे हे सरकार मराठा आणि ओबीसींचं भांडण लावत शेवटी आरक्षणालाच मूठमाती देणार हे स्पष्ट असल्याचे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती