शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी आपलं नवं गाणं लॉन्च केलं आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिवसेनेच्या या नव्या गाण्याला शिवसैनिकांकडूनही मोठी दाद मिळत आहे. शिवसेनेचं हे नवं गाणं गीतकार मंदार चोळकर याने लिहलं असून, याला संगीतबद्ध करण्याचं काम स्वप्नील गोडबोले या नव्या दमाच्या संगीतकारानं केलं आहे.