NEET पेपर लीक प्रकरण : लातूर पोलिस CBI कडे सोपवणार नीट केस, शिक्षकांसोबत चार आरोपींची करणार चौकशी

शनिवार, 29 जून 2024 (14:58 IST)
नीट पेपर लीक प्रकरणात केंद्रीय चौकशी एजंसी ची टीम आता महाराष्टातील लातूरमध्ये जाणारा आहे. लातूर पोलिसांची SIT सीबी आयला नीट पेपर लीक केस सोपविण्यात अली आहे. सीबीआय एक किंवा दोन दिवसांमध्ये लातूर नीट पेपर मध्ये पकडले गेलेले आरोपींची चौकशी करणार आहे. 
 
महाराष्ट्र पोलिसांची एटीएसला 21 जून ला नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या संलिप्तता बद्दल सूचना मिळाली होती. सूचनांवर कारवाई करीत लातूर मध्ये असलेले टाकळी स्थित जिल्हा परिषद शिक्षकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दोघांचे मोबाईल चेक करण्यात आले त्यामध्ये संदिग्ध डेटेल्स मिळालया. त्यांनतर त्यांना अटक करण्यात अली आहे. लातूर पोलिसांनी आता ही केस सीबीआयडे सोपवणार आहे. जी पहिल्यापासून नीट पेपर लीक प्रकरणात बिहार, झारखंड आणि गुजरातच्या वेगवगेळ्या भागांमध्ये छापे टाकत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती