राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी रेल मंत्र्यांचा राजीनामा मागितला

सोमवार, 5 जून 2023 (09:16 IST)
Sharad Pawar: ओडिशातील बालासोर येथे तीन ट्रेनच्या अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून 800 हून अधिक लोक जखमी झाले आहेत . केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घटनास्थळी भेट दिली आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या अपघातावर आपली प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.  
राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार म्हणाले सत्य जे असेल ते बाहेर येईल. त्यांनी जुने उदाहरण दिले आणि म्हणाले की, लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात दुसरा अपघात झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या राजीनाम्याच्या विरोधात होते. शास्त्रीजींनी त्यावेळी राजीनामा दिला. तो काळ वेगळा होता. रेल्वे मंत्रींना जे योग्य वाटेल ते करावे. पण नैतिकतेच्या आधारे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असे मला वाटते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील रेल मंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. 
अपघाताची सखोल चौकशी करून तपासाचा अहवाल लपवू नये असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 
 
Edited by - Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती