नवरदेवाची कार फुलांऐवजी चिप्स ने सजवली, व्हिडीओ व्हायरल

मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (19:35 IST)
कोरोना महामारी मध्ये काहीसा दिलासा मिळाल्यावर सरकारने महाराष्ट्राच्या सरकार ने काही अटींसह लग्नाला परवानगी दिली आहे. बहुतेक लोक साध्या पद्धतीने लग्न समारंभ साजरा करत आहे.  नाशिकच्या दांडोरी तालुक्यात जानोरी येथील लग्न समारंभातून सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बघून जे आपल्याला हसण्याला भाग पाडेल. इथे नवरदेवाची कार फुलांऐवजी कुरकुरे आणि चिप्स, वेफर्स ने सजविली आहे. फुलांच्या किमती जास्त असल्याने नवर देवाची कार चक्क चिप्सच्या पॅकेट ने सजविण्यात आली. सध्या 20 फुलांचे गुंठ्याला 400 रुपयांचा भावात मिळत आहे. त्यामुळे कार सजविण्यात सुमारे 9 ते 10 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. हे परवडत नसल्यामुळे नवरदेवाची कार फुलांऐवजी चिप्स ने सजविण्यात आली.हा आयडिया नवरदेवाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. नवरदेवाच्या भन्नाट आईडियाची सर्वत्र चर्चा होत आहे. आकाश वसंत भसरे हे नवरदेवाचे नाव आहे. नाशिकच्या दांडोरी तालुक्यातील  जानोरी गावात आकाश भसरे यांचे लग्न कविता हिच्याशी पार पडलं . वऱ्हाड न्यायची वेळा आली तेव्हा नवं वधू ला नेण्यासाठी कार सजविण्यासाठी फुलांचे दर वाढल्यामुळे 9 ते 10 हजार रुपयांचा खर्च येत होता. हा परवडत नसल्याने. आकाश यांनी एक युक्ती केली. त्यांनी नववधूला नेण्याची कार चक्क चिप्स च्या पाकिटाने सजवली. 10 हजार ऐवजी चक्क 1500 रुपयात काम झाले. या मुळे वऱ्हाड डीजेच्या तालावर रंगत दणक्यात निघाली. नवरदेवाच्या या भन्नाट आयडियाची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे.   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती