नाशिक: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. अशातच शासनाच्या नियमाप्रमाणे PM किसान योजनेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करुनही अनुदान मिळत नसल्यामुळं संबंधित विभागाकडे चौकशी केला असता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील एका शेतकऱ्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.