पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी पीएम किसानचा 12 वा हप्ता जारी केला. 12 व्या हप्त्यात 8,84,56,693 शेतकर्यांच्या खात्यात 2000-2000 रुपये जमा झाले, तर 2,43,03,867 शेतकर्यांना पैसे मिळाले नाहीत.
पीएम किसानच्या 11व्या हप्त्यात 11,27,60,560 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत ते पीएम किसानच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतात. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana)लाभार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
पीएम किसानशी संबंधित कोणतीही समस्या सोडवण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी शेतकरी टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे कळू शकते. खात्यात पैसे येतील की नाही? ही सर्व माहिती टोल फ्री क्रमांकावर कॉल करून उपलब्ध होईल. याबाबतची माहिती कृषी मंत्रालयाने ट्विट करून दिली आहे.
2,43,03,867 शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळाला नाही-
पीएम किसानच्या वेबसाइटनुसार, सरकारने 17 ऑक्टोबर 2022 रोजी पीएम किसानचा 12 वा हप्ता जारी केला होता. 12 व्या हप्त्यातील 2,43,03,867 शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. 11व्या हप्त्यात 11,27,60,560 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग करण्यात आले.
13 वा हप्ता लवकरच जारी केला जाईल-
पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. हे हप्ते दर चार महिन्यांनी येतात म्हणजे वर्षातून तीनदा 2000-2000 रुपये योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. 13 वा हप्ता लवकरच जारी होणार आहे.