नाशिककरांनो पाणी सांभाळून वापरा अन्यथा…

बुधवार, 31 मार्च 2021 (23:14 IST)
नाशिक गंगापूर धरणाची पातळी साधारणत: 50 टक्के झालेली आहे. आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होऊ नये व पुरेशा प्रमाणात पाणी आगामी काळात पावसाळयापर्यंत पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे यासाठी नागरिकांनी पाणी सांभाळून वापरावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेने केले आहे.
 
नाशिक शहरासाठी पाटबंधारे विभागाच्या गंगापूर धरण समूह,दारणा धरण (चेहेडी बंधारा) व मुकणे धरण यातून रॉ वॉटर पंपीग करुन मनपाच्या सात जलशुध्दीकरण केंद्रामार्फत दैनंदिन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेत येतो. सद्य:स्थितीत गंगापूर धरणाची पातळी साधारणत: 50 टक्के झालेली आहे. आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होऊ नये व पुरेशा प्रमाणात पाणी आगामी काळात पावसाळयापर्यंत पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यानुसार किमान उपलब्ध पाणी साठा हा पिण्यासाठी पुरेल यासाठी जेणेकरुन भविष्यात भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार नाही.
 
यासाठी खालीलप्रमाणे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
सर्व नागरिकांनी पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे. पाणी शिळे होत नाही त्यामुळे उरलेले पाणी फेकून देऊ नये. आंघोळीसाठी शॉवरचा वापर करु नये. घराच्या पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होणार नाही याची दक्षता घेणे आणि व्हॉल्व वॉल लेव्हल सेंसरचा वापर करणे. वाहने नळीचा वापर करुन धुऊ नये तसेच अंगण अथवा रस्त्यावर सडा मारुन पाण्याचा अपव्यय करु नये. नळ कनेक्शनला डायरेक्ट मोटार / पंप बसू नये. पाणी साठविण्यासाठी जमिनीत टाकी / सम्प नसल्यास ते बांधावे. तीन “R” चा वापर करणे (Reduce, Reuse & Recycle) म्हणजेच अ – पाण्याचा कमी वापर ब – पुर्नवापर, क- पुर्नप्रक्रिया यांचा अवलंब करावा. त्याचप्रमाणे सतत नळ चालू ठेवून कपडे/भांडी धुऊ नये. उदयानात पिण्याचा पाण्याचा वापर करु नये. नळाच्या तोटया नादुरुस्त असल्यास दुरुस्त करुन घेणे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती