नाशिककरांनो नक्की वाचा : शहरात पुढील आठवड्यापासून ‘या’ वारी पाणीपुरवठा नसेल
बुधवार, 21 जुलै 2021 (08:05 IST)
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे धरणातील पाणी पातळी खुपच कमी झाली आहे. यामुळे एक मोठे जलसंकट नाशिककरांसमोर उभे थाटले आहे.यासाठीच पूर्वकाळजी म्हणून महापालिकेतर्फे शहरातील पाणीपुरवठ्याचे फेर नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक शहराला गंगापूर धरण, दारणा धरण (चेहेडी बंधारा) व मुकणे धरण यातून दैनंदिन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.पावसास सुरुवात झाली नसल्याने आगामी पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाणी पुरवठ्यात काही बदल करण्यात आले आहे.
नाशिक शहरात गुरुवारी दिनांक २२ जुलै रोजी व त्यापुढील आठवडयात प्रत्येक बुधवारी संपूर्ण शहरात संपुर्ण दिवस पाणी पुरवठा होणार नाही.याची नागरीकांनी नोंद घ्यावी,असे महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.