गुरुवारी सायंकाळी 4:30 च्या सुमारास पेठ बस आगारातील निघणारी बस पेठ नाशिक मार्गे पुण्याच्या दिशेने निघाली असता नाशिक कडून रामशेज आशेवाडी गावाच्या दिशेने जाणारा सिमेंट मिक्सर ट्रकची नाशिक महापालिकेच्या कमानीजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली.ही धडक एवढी जोरदार होती की अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर 10 प्रवासी जखमी झाले आहे. स्थानिकांनी अपघाताची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बसमधील प्रवासींना दुसऱ्या बसने पाठविण्यात आले आहे.