Nagpur : सौर उपकरणे बनवणाऱ्या कंपनीत स्फोटात नऊ जणांचा मृत्यू

रविवार, 17 डिसेंबर 2023 (12:16 IST)
नागपुरातील बाजारगाव येथील सौर उपकरणे बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला. 
सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला.

या कारखान्यात मोठ्या प्रमाणात दारूगोळा व रसायने असल्याने जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. या स्फोटाची नेमकी तीव्रता अद्याप समोर आलेली नाही.नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली.
 
एक इमारत उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण बचावल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असून आत गेल्यानंतर परिस्थिती स्पष्ट करता येईल,
 
सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनी भारतातील अनेक कंपन्यांना दारूगोळा पुरवण्याचे काम करते. संरक्षण क्षेत्राशी संबंधित काही कंपन्यांना दारूगोळा आवश्यक असतो. स्फोटाचे वृत्त समजताच कंपनीच्या गेटसमोर मोठी गर्दी झाली आहे. या घटनेत मृत किंवा जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. 
 
Edited by - Priya Dixit
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती