पुण्यातील तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या एका फायर क्रेकर कारखान्यात भीषण स्फोट होऊन आग लागली. या अपघातात 7 महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. सदर घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली असून केकवर लावल्या जाणाऱ्या फायर क्रेकरची कंपनीचे गोदाम होते. तापमानात वाढ झाल्याने हा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कंपनीला दार नसून शटर असल्याने येणे जाणे करण्यासाठी हाच मार्ग होता आणि शटर बंद असल्याने या महिला कामगार तिथेच अडकून पडल्या आणि आगीत होरपळल्या.