Aurangabad : भाऊ बहिणीचा खड्ड्यात पडून दुर्देवी मृत्यू

शनिवार, 16 डिसेंबर 2023 (18:36 IST)
औरंगाबादातील वाळूजच्या बजाजनगरात मोकळ्या मैदानात खेळायला गेलेल्या चिमुकल्या भाऊ -बहिणीचा खोल खड्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. चैताली राहुल देशमुख (11) आणि समर्थ राहुल देशमुख असे या मयत चिमुकल्यांनी नावे आहे. 
 
बजाज नगर येथे राहुल देशमुख आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह भाड्याने राहतात. राहुल यांच्या पत्नी विद्या या कंपनीत कामाला आहे. मुलगी चैताली इयत्ता चवथीत तर मुलगा समर्थ हा इयत्ता दुसरीत शिकत होता. 
शुक्रवारी दुपारच्या वेळी हे दोघे मुल एका मोकळ्या भूखंडावर खेळायला गेले होते. या भूखंडावर मोठा खड्डा खणला आहे. या खड्ड्यात ड्रेनेजचे पाणी साचते.या मुळे या खड्ड्यात 10 ते  15 फूट पाणी साचले आहे.

खेळता खेळता समर्थ या खड्ड्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी बहीण चैताली ही देखील खड्ड्यात उडी घेतली आणि पाण्यात बुडाली. त्यानं बुडताना बघून त्यांच्या सोबत खेळत असलेल्या राजबीर नावाच्या मुलाने आरडा-ओरड करायला सुरु केली. पण दुर्देवी तिथे कोणीच न्हवते. राजवीर ने जवळच्या मैदानात जाऊन एका तरुणाला दोन मुल पाण्यात बुडाले असे सांगितले. 

ही माहिती मिळतातच दोन तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली त्यांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले या वेळी पोलीस देखील तिथे उपस्थित होते. चिमुकल्यांना खड्ड्यातील पाण्यातून बेशुद्धावस्थेत बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. 
मुलांचे मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती