नागपूर: सना खान हत्येचे गूढ उलगडले , पतीनेच केला खून

शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (20:32 IST)
नागपूर: भाजप नेत्या सना खान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. प्रमुख संशयित आरोपी अमित साहू याला जबलपूरमधून अटक करून नागपुरात आणले. महत्त्वाचे म्हणजे अमित साहू हा सना खान यांचा पती असून त्याने सना खान हिची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. एवढच नाही तर सना खान यांचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली आहे .
 
असे असले तरी सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. भारतीय जनता युवा मोर्च्याच्या पदाधिकारी सना खान १ ऑगस्टला अमित शाहूला भेटायला जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या.
जबलपूर मध्ये हिरण नदीमध्ये मेरेगाव जवळ अमित साहू आणि त्याचा मित्र राजेश सिंह यांनी सना खान यांचे मृतदेह नदीत फेकले होते. त्याच ठिकाणी सध्या जबलपूर पोलीस, नागपूर पोलीस आणि एसडीआरएफ ची टीम नदीमध्ये सना खान यांचा मृतदेह शोधत आहेत. पण अजून मृतदेह मिळालेले नाही. मात्र अनेक टीम्स या कामी लागल्यामुळे लवकरच सना खान यांचे मृतदेह नदीपात्रात मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
मागील दहा दिवसांपासून भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान या बेपत्ता असून अद्याप त्यांच्याविषयी काही ठोस माहिती मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी अमित साहूसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण झाले. त्यानंतर सना त्याच रात्री तातडीने अखेरच्या बसने जबलपूरला गेली, मात्र ती पुन्हा परतलीच नाही. अमित साहू आणि सना खान यांची मैत्री होती. अमित साहू हा जबलपूरमधील एक हॉटेल व्यावसायिक आहे. सना खान आणि अमित साहून या दोघांनी लग्न केलं असल्याचं समोर आलं आहे.


Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती