Nagpur News : सापाचं नाव जरी काढलं की अंगाचा थरकाप उडतो. साप चावल्यावर त्यावर वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे. साप चावल्यावर आज ही अनेक गावात रुग्णालयात न जाता एखाद्या अघोरी बाबा कडे लोक जतात. हे भोंदूबाबा भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक करतात आणि रुग्णाचा जीव धोक्यात घालतात. अंधश्रद्धेमुळे लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम हे भोंदूबाबा करतात. असाच काहीसा प्रकार नागपूरच्या रामटेक तालुक्यात कट्टा गावात घडला आहे.
सर्पदंशावर उपचार करण्याचा दावा करणारा हा भोंदू बाबा सापा सारखा हिस्स हिस्स आवाज काढतो आणि सापा सारखा जमिनीवर रेंगाळून चालतो त्याचा अंगात सापाचा संचार होतो असा दावा हा बाबा करतो. त्याने सर्पदंशावर उपचार देखील केल्याचे सांगतिले आहे.या सर्व प्रकाराची माहिती वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोयायटीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर त्यांनी हा सर्व प्रकार बघण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले.