राज्यातील 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतीसाठी निवडणूका जाहीर
राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या (एकूण 212) सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यांत 27 नोव्हेंबर, 14 व 18 डिसेंबर 2016 आणि 8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर यातील 192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठीदेखील संबंधित दिवशी मतदान होईल. मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.
यात मुदत संपणार्या 190 नगरपरिषदा व 4 नगरपंचायती; तर नवनिर्मित 2 नगरपरिषदा व 16 नगरपंचायतींचा समावेश आहे. या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आणि त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्यास त्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणीची आचारसंहिता संपुष्टात येईल.
निवडणूक एका दृष्टिक्षेपात
• मुदत संपणाऱ्या 190 नगरपरिषदा व 4 नगरपंचायती;
• नवनिर्मित 2 नगरपरिषदा व 16 नगरपंचायती
• एकूण 212 नगरपरिषदा व नगरपंचायती
• नगरपरिषदेच्या 192 थेट अध्यक्षपदासाठी निवडणूक
• एकूण 2,485
• एकूण जागा 4,750
• महिलांसाठी एकूण आरक्षित जागा 2,445
• अनुसूचित जातींसाठी एकूण आरक्षित जागा 608
• अनुसूचित जमातींसाठी एकूण आरक्षित जागा 198
• नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण आरक्षित जागा 1,315
निवडणूक होणार्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे
टप्पा क्र. 1:
27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: