New Delhi News: आसाममधून दिल्ली प्राणीसंग्रहालयात आणलेल्या नर एक शिंगे गेंड्याच्या 'धर्मेंद्र'चा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे. गुरुवारी याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'धर्मेंद्र' आज मृतावस्थेत आढळून आला. सप्टेंबर 2024 मध्ये येथे आणण्यात आलेला हा 11 वर्षांचा गेंडा उत्तम स्थितीत असून त्याला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली प्राणिसंग्रहालयाचे संचालक संजीत कुमार यांनी सांगितले की, धर्मेंद्र सकाळी मृतावस्थेत अढळला. ते म्हणाले की, गेंडयाला तात्काळ प्राणिसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. तसेच त्याचा पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच गेंड्याच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.