लग्नात नाचताना तरुणाची हत्या

शनिवार, 30 एप्रिल 2022 (14:22 IST)
लग्नाच्या वरातीत नाचताना धक्का लागल्यामुळे एका 12 वर्षाच्या मुलाने 27 वर्षाच्या तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे घडली आहे. लग्नात डीजेच्या तालावर नाचताना एक 12  वर्षीय मुलाला एका तरुणाचा धक्का लागला. त्यांच्यात वाद झाला आणि नंतर हा वाद विकोपाला गेला. नंतर मुलाने त्याच्या जवळचा चाकू काढून तरुणावर वार केले. तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले .असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राहुल गायकवाड असे या मयत तरुणाचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात काटोलमध्ये अण्णाभाऊ साठे नगरात एका लग्नात लावलेल्या डीजेवर नाचताना ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मुलाला मयत राहुल गायकवाड याचा धक्का लागला त्यामुळे दोघात वाद झाले नंतर हे वाद विकोपाला गेले आणि रागाच्या भरात आरोपी मुलाने मयत राहुलवर चाकूने वार केले.त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला काटोलच्या रुग्णालयात नंतर नागपुरातील रुग्णालयात रेफर केले. तिथे त्याचा उपचाराधीन असताना मृत्यू झाला. 

पोलिसांनी हत्येचे प्रकरणाची नोंद केली असून 12 वर्षाच्या आरोपी मुलाला अटक केली असून बाल सुधार गृहात त्याची पाठवणी केली असून पोलीस तपास करत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती