गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील पिपावाव बंदरावरून 90 किलोचं हेरॉईन जप्त करण्यात आलं. हे हेरॉईन इराणमधून आलं होतं. गुजरात अँटी-टेररिस्ट स्क्वाड (ATS) आणि डायरेक्टोरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजियन्स (DRI) यांनी ही संयुक्त कारवाई केली.
या 90 किलो हेरॉईनची किंमत सुमारे 450 कोटी रुपये इतकी आहे.
हेरॉईनच्या तस्करीसाठी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती. हेरॉईनमध्ये धागे भिजवण्यात आले होते आणि त्यांची तस्करी करण्यात येत होती. यासंदर्भात पुढील तपास करण्यात येत आहे.