सूर्य विदर्भात मागील काही दिवसांपासून जास्त तापत आहे. नागपूर, अकोला, वर्धा, चंद्रपुरात तापमान 45 अंशापेक्षा जास्त आहे. राज्यात काही भागात अवकाळी पाऊस पडला. तर राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात उकाडा जास्त जाणवत आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. विदर्भात 2 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहे.
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली असून इथे पारा 46.4 अशा पर्यन्त पोहोचला आहे. जळगावात 45.9 अंश एल्सिअस अकोला 45.4 अंश ,यवतमाळ 45.2, वर्धा 45.1 नागपूर 45.2 तर अमरावतीत 45 अंश तापमानाची नोंद झाली .