दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यांसह इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीयऐवजी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवावी, अशी मागणी काही नेत्यांची आहे. त्यातही अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आलेला आहे.
याव्यतिरिक्त नगर पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. त्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपालिकेत 2, तर नगर पंचायतीमध्ये 1 प्रभाग पद्धत असेल, असं राज्य सरकारने सांगितलं आहे.