अलीकडे शेतकऱ्यांचे पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत शेतीमालाला योग्य दर मिळत नाही. आणि अशा अवस्थेत देखील रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरवात झाली असताना आता शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. शेतकर्यांसाठी आता केवळ 8 तास वीजपुरवठा राहणार आहे.
आतापर्यंत शेतीसाठी 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, ऐन रब्बीच्या तोंडावरच यामध्ये बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.
दरवर्षी रब्बी हंगामाला सुरवात झाली की महावितणकडून हा निर्णय घेतला जातो. अशात पाणीसाठा असतानाही अडचणी निर्माण होणार आहेत. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रब्बी हंगामातील पिकांची जोपासना ही साठवूकीच्या पाण्यावरच करावी लागते. मात्र आता 1 नोव्हेंबरपासून नियमात बदल करुन शेतीसाठी 8 तासच विद्युतपुरवठा राहणार आहे.
कोळसा टंचाईचे कारण पुढे करीत ही वीज कपात करण्यात आली आहे.