राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने यांच्याशी संबंधित असलेल्या कोटीची संपत्ती जप्त करण्याची नोटीस काढण्यात आली आहे.आयकर विभागाने काढलेल्या या नोटीस मध्ये एक साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील फ्लॅट, गोव्यात असलेली संपत्ती, मुंबईतील इमारतीचा समावेश आहे.
गेल्या काही महिन्यापासून आयकर विभागाने राज्यातील विविध ठिकाण्यावर धाड टाकलेली असून त्यात 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता , संशयास्पद व्यवहार, कागदपत्रे सापडली आहे. ईडी कडून देखील उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्याचे सत्र सुरु होते. तसेच आयकर विभागाने कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा ,दिल्ली आणि जयपूर येथील ठिकाणांवर छापेमारी केली आहे.