मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील एक महिलेचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले. महिलेचा पती गादी बनवण्याचे काम करतो. लग्नानंतर ते नागपुरात राहायला आले. लग्नाच्या चार वर्षांनी एका दाम्पत्याला मुलगी झाली. ते दोघेही आनंदात होते. पण बाळ दूध पीत नसल्याने महिलेला मानसिक ताण आला. तिने आपल्या पतीला बाळ दूध पीत नाही सांगितल्यावर तू काळजी करु नको.औषध घेतल्यावर सगळे नीट होईल असे पतीने तिला समजावले. तरीही महिलेचा ताण वाढत होता.
काही दिवसांपूर्वी ती तिच्या बहिणीकडे राहायला गेली असता देखील तिचा ताण कमी झाला नाही. 11 फेब्रुवारीला ती तिच्या आईच्या सोबत पतीच्या घरी आली तिच्या आईने देखील तिला समजवण्याचा प्रयत्न केला तरीही तिची काळजी काही कमी झाली नाही. अणि तिने 13 फेब्रुवारी रोजी तिने बाथरूम मध्ये जाऊन विषारी औषध प्राशन केले. तिची तब्बेत बिघडल्यावर तिने आईला सांगितले. उलट्या झाल्यावर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचाराधीन असता तिचा मृत्यु झाला. या घटनेनंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे.