Maharashtra Marathi Breaking News Live Today: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती युती म्हणून लढवेल परंतु स्थानिक परिस्थितीचा विचार करून काही निर्णय घेतले जातील. या विधानामुळे भाजप अप्रत्यक्षपणे या निवडणुका स्वबळावर लढण्याची रणनीती राबवत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....