Maharashtra Marathi Breaking News Live Today: महायुतीत सर्व काही ठीक नसल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले नाही म्हणून ते रागावले आहे तर भाजप कडून वारंवार त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या सुरु झालेल्या अनेक योजना बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला असल्याच्या बातम्या येत आहे. परंतु महायुतीतील मतभेदांच्या बातम्यांना मंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, महायुतीने सुरू केलेली कोणतीही योजना बंद केली जाणार नाही. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....