यंदा 85 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिकचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि हाँगकाँग स्थित एकूण 63 आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरीच्या संधी या पहिल्या टप्यात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या.
मागील वर्षीच्या प्लेसमेंटच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सरासरी विद्यार्थ्यांच्या पॅकेजमध्ये सुद्धा वाढ झाल्याचे चित्र आहे. मुंबई आयआयटीमध्ये नोकरीसाठीच्या कॅम्पस मुलाखतीसाठी एकूण 388 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यानी सहभाग घेतला. मागील शैक्षणिक वर्षात प्लेसमेंटमध्ये 16 विद्यार्थ्यांनी 1 कोटी पेक्षा अधिक वार्षिक पॅकेजचा स्वीकारले होते, यंदा पहिल्या टप्प्यात 85 विद्यार्थ्यांना एक कोटींहून अधिकचं पॅकेज मिळालं आहे.
20 डिसेंबरपर्यंत एकूण 1340 नोकरीचे प्रस्ताव विविध कंपन्यांनी दिले, त्यापैकी 1188 विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यात यश आले. यामध्ये पीएसयूमध्ये 7 जणांचा तसेच इंटर्नशिपद्वारे 297 पीपीओचा समावेश असून यापैकी नोकरीचे 258 प्रस्ताव स्वीकारण्यात आले आहेत.