तान्ह्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे विधिमंडळात; चर्चा तर होणारच

सोमवार, 19 डिसेंबर 2022 (16:46 IST)
नाशिक – देवळाली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधान भवन परिसरात आज पोहचल्या आहेत.त्यामुळेच सध्या संपूर्ण विधिमंडळात त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
 
आजपासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनात सहभाग घेण्यासाठी आ. आहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळाला घेऊन पोहचल्या आहेत. नव्याने सुरु झालेल्या समृध्दी महामार्गावरुन प्रवास करत  त्यांनी नागपूर गाठले. त्यानंतर त्यांनी अधिवेशनात आज सहभाग घेतला. बाळ आई शिवाय राहू शकते नसल्यामुळे मी त्याला घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. देवळाली या माझ्या मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे असून ते विधानसभेत मांडण्यासाठी मी आले आहे. त्याचबरोबर अडीच महिन्याच्या बाळाची आई म्हणून त्याच्याबद्दलही कर्तव्य बजावणे महत्त्वाचे आहे.. त्यामुळे मी दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती