विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (08:43 IST)
नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपये मदत करण्यात येत होती. त्यामध्ये तिपटीने वाढ करून पंधरा हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासारखेच शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
कोविडच्या निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे. 9 दिवसांमध्ये 6 दिवसाचे कामकाज झाले. माझ्या दृष्टीनं हे अधिवेशन खूप यशस्वी ठरले असे मुख्यमंत्र्यांनी सांगून या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह महत्त्वपूर्ण अशी विधेयके मंजूर करण्यात आली.
या अधिवेशनात एकूण 10 विधेयके मंजूर करण्यात आली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत अभिनंदन प्रस्ताव
नवनियुक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव.
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याबाबत, तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण करण्याचा केंद्र शासनाला शिफारस करण्याचा विधानमंडळाचा ठराव.
या अधिवेशनात विविध विभागांच्या 25 हजार 826.72 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली.
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक.
राज्यात “एक दिवस बळीराजा” साठी ही संकल्पना राबवणार.
o सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळणार.एनडीआरएफ पेक्षा दुप्पट मदत
o पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर.
o शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा.
आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण.
मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार तीन वर्षात काम पूर्ण करणार.
धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार.
गिरणी कामगारांना 50 हजार सदनिका देण्यासाठी उपलब्ध होत आहेत. त्या त्यांना देण्यात येतील.
मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली.