45 दिवसांनतर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना डिस्चार्ज

शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (21:57 IST)
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कॅन्सर असल्याचे निदान झाल्यापासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 45 दिवसांपासून  त्यांच्यावर उपचार सुरु होते. दीड महिन्याच्या काळात पाच कीमोथेरेपी देऊन उपचार सुरु होते. अखेर शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार असल्याने त्यांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचा डिस्चार्ज होताच कुटुंबीय व लोक बिरादरी प्रकल्पाचे स्वयंसेविका यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 
प्रकाश आमटे यांचे वय आता 74 एवढे झाले आहे. मध्यंतरी त्यांची तपासणी केली त्यावेळी त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातच उपचार सुरु होते. दरम्यानच्या काळात न्यूमोनिया झाला त्यामुळे तापही वाढला होता. गेल्या 45 दिवसांत त्यांच्यावर पाचवेळेस कीमोथेरेपी करण्यात आली होती. वारंवार ताप येणे, वजन कमी होणे, अति घाम येणे, दम लागणे, हाडांचे दुखणे, त्वचेवर लाल ठिपके येणे असे त्रास जाणवत होते. अखेर त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले असून त्यांची तब्येत आता ठिक असल्याने डिस्चार्ज देण्यात आल्याचे मोठा मुलगा अनिकेत आमटे यांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती