पुणे मेट्रोमध्ये चक्क ढोल वादन

गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (13:17 IST)
पुण्याची मेट्रो उद्घाटन झाल्यापासूनच कायम चर्चेत असते. मेट्रो सातत्याने चर्चेत असते ती पुणेकरांमुळेच कारण पुणेकर काय करतील याचा काही नेम नाही. मेट्रो सुरु झाल्यापासून प्रवासाठी तसेच इतर कामांसाठी देखील पुणेकरांनी तिचा पुरेपूर वापर केला आहे.
 
हल्ली राज्यभरात सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असून पुण्यातही ढोल पथकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र आता एका ढोल पथकाने थेट पुण्याच्या मेट्रोमध्येच वादन केलं आहे. सोशल मीडियावर या वादनाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 
 
पुण्याच्या दुर्गा ब्रिगेट संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे गणेशोत्सवानिमित्त तयारी करण्यासाठी मेट्रोमध्ये ढोल पथकाने वादन केलं. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे गणेशोत्सवानिमित्त सोमवारी संध्याकाळी ढोल ताशा पथकातर्फे वादन करण्यात आलं.
 
आता याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे मात्र वादनावरुन नेटकऱ्यांनी जोरदार टीकाही केली आहे. या वादनामुळे नागरीक अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
 
पुणे मेट्रोत नागरीकांना वेगळेवेगळ्या प्रकारचे सोहळे साजरे करता येत  आहे. काही दिवसांपुर्वी याच मेट्रोत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमदेखील पार पडला होता. तसेच यात वाढदिवस, वर्धापनदिन किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता येणार आहे.
 
खरं तर पुणे मेट्रो रेल्वेने खाजगी उत्सवांसाठी एक डबा देण्याची घोषणा केली. यात ज्यांना कार्यक्रम साजरे करणार्‍यांसाठी डब्यात एक फेरी (येणे-येणे) दिली जाईल. हा उपक्रम खुला असेल. दोन्ही मार्गांवर - लाईन 1 (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते फुगेवाडी) आणि लाईन 2 (गरवारे कॉलेज ते वनाज) सुरु असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती