या पूर्वीही आमदार बच्चू कडू यांनी विविध ठिकाणी भेट देऊन तिथल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. दरम्यान नाशिकला आल्यानंतर त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांचा ताफा नाशिक सिंचन विभाग कार्यालयाकडे वळवला. राज्यमंत्र्यांचा ताफा पाहताच अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात कडू यांनी हजेरी पुस्तक मागवून कोणते कर्मचारी अनुपस्थित आहेत, याची खातरजमा करून घेतली. यावेळी अनेक आअधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले. तर अनेक काम प्रलंबित ठेवल्याचं निष्पन्न झाल्याने अधिकाऱ्यांना यावर खुलासा करण्याचे सांगितले.त्याचबरोबर विभागातील अन्य कामकाजासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक कामात अनियमितता आढळल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली.