नराधम पित्यानेच केला मुलीवर अत्याचार

उमरखेड- टाकळी येथे बापाने मुलीवर अत्याचार करून बाप- लेकीच्या नात्याला काळिमा फासला आहे. 48 वर्षीय आरोपी संजय धोंडबा पाईकराव याने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना 19 जानेवारी रात्री घडली ज्याने तालुक्यात खळबळ उडाली.
आरोपी मुलीसह पारिवारिक कामानिमित्त उमरखेडला आला होता. गावाकडे जाण्यास उशीर झाला म्हणून वाहन भेटले नाही तेव्हा ते रात्री शहरापासून 6 ते 7 किमीवर असणार्‍या टकाळी येथे पायी चालत गेले. तेव्हा त्याने टाकळी शिवारात रात्री 11 च्या दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन वाईट वासनेने स्वत:च्या मुलीवर अत्याचार केला. तेव्हा मुलीने नराधम बापाच्या तावडीतून स्वत:ला कसेबसे सावरत घटनास्थळावरून पळ काढला व टाकळी शिवारात राहणार्‍या नातेवाइकांकडे रात्रभर आश्रय घेतला.
 
20 जानेवारी रोजी सकाळी उमरखेड पोलिस स्टेशन गाठून स्वत:च्या नराधम बापाविरुद्ध फिर्याद दाखल केली. यावरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार सुरक्षा व संरक्षण कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून उमरखेड पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा