इथे बराच वेळ झाल्यावर देखील तो घरी आला नाही तेव्हा कुटुंबातील सदस्य काळजीत पडले आणि त्याचा शोध घेऊ लागले. शोध घेतल्यावर देखील तो सापडला नाही. तेव्हा कुटुंबीय पुलगाव पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि मुलाचा शोध सुरू झाला. सर्व नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला, परंतु काहीही कळले नाही.
जबलपूर चाइल्ड लाईनमधील चव्हाण नावाच्या एका महिला कर्मचाऱ्याने तिथे पोहोचून सुमितला विश्वासात घेतले आणि माहिती गोळा केली. नंतर तिने पुलगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधून सुमितबद्दल माहिती दिलीरात्री उशिरा पुलगाव पोलिसांना जबलपूर चाइल्ड लाईनकडून फोन आला. चर्चेनंतर जबलपूरमध्ये सापडलेला मुलगा सुमित असल्याचे स्पष्ट झाले.यानंतर, पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुलगावहून एक पथक सुमितला घेण्यासाठी जबलपूरला रवाना झाले.