स्टेटसला ‘गुडबाय’ असे लिहून तरुणाचा गळफास

बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (18:37 IST)
हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला एका तरुणाने व्हॉट्सअपच्या स्टेटसला गुडबाय असे लिहून एका गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे औरंगाबाद शहरात घडली. हा तरुण औरंगाबादमधील फायनान्स कंपनीत काम करत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
आत्याला सांगितले, मी थकलोय…
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागे मधुकर तुरुकमाने (वय 25 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. नागेशचे शिक्षण एम.ए. पर्यंत झालेले आहे. तो मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असून लहानपणापासून तो औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा येथील पेठेनगर भाहगात रहात होता. आत्या मुंबई येथे कामानिमित्त गेल्या होत्या. नागेश घरात एकटाच होता. मंगळवारी रात्री मुंबईहून रेल्वेने त्याच्या आत्या औरंगाबादेत आल्या. त्यांनी नागेशला घेण्यासाठी ये, असा फोन केला. मात्र मी थकलो आहे, असे नागेशने त्यांना सांगितले. त्यामुळे आत्या नातेवाईकांच्या घरी झोपल्या.
 
रात्री तीन वाजता बदलले स्टेटस
दरम्यान पोलिसांनी तरुणाच्या मोबाइलचा तपास केल्यानंतर, त्याने रात्री तीन वाजता व्हॉट्सअपचे स्टेटस बदलले व त्यात गुडबाय असे लिहिले. तसेच हा मेसेज त्याने मावस भावालादेखील केला. त्यानंतर घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली. पहाटे झोपेतून उठल्यावर मावस भावाने त्याचा मॅसेज पाहिला व आत्याला याबाबत कल्पना दिली. आत्याने तातडीने घर गाठले तेव्हा आत नागेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती