मुंबईच्या उत्तर विभागात स्थित असलेले हे ठिकाण नवी मुंबई आणि ठाण्याशी त्वरीत संपर्कास सुलभ आहे आणि त्यांच्या मालमत्ता क्षेत्राला चालना मिळाली आहे. बोरिवली, मालाड आणि कांदिवलीतील व्यावसायिक, मिरा रोडमधील परवडणाऱ्या भाडेदरांमुळे तेथे स्थलांतरित होण्याचा विचार करत असून उगवते चित्रपट कलाकार आणि टीव्ही कलाकार मिरारोडमध्ये तेथील स्थापित साधनसुविधांमुळे घरे पाहत आहेत.
श्री. मनोज असरानी, उपाध्यक्ष- विक्री आणि मार्केटिंग, जेपी इन्फ्रा मुंबई प्रा. लि. यांच्या मते मिरारोडमधील १ बीएचके घरांना मासिक ८००० रूपयांपासून ते १४००० रूपयांपर्यंत भाडे मिळत आहे आणि त्यामुळे या विभागाला अनेक दुसऱ्या वेळी घर खरेदी करणाऱ्या आणि स्थानिक गुंतवणूकदारांचे नंदनवन म्हटले गेले आहे. मिरारोडचा महत्त्वाचा यूएसपी म्हणजे येथे निवासी मालमत्ता खरेदी करताना आपल्याला सर्वोत्तम परवडणारे दर दिले जातात. याशिवाय मालमत्तेच्या जास्त दरांमुळे मिरारोडमध्ये घरे खरेदी करता येत नाहीत परंतु नवीन बिल्डर्स विविध पर्याय शोधत आहेत. घर म्हणजे एक गुंतवणूक आहे. अर्थातच गुंतवणुकीवरील फायदे आणि आर्थिक परिस्थितीही महत्त्वाची आहे. परंतु अधिक महत्त्वाचे म्हणजे जीवनावर होणारे लाभ आहेत. जेपी नॉर्थ हा एक महत्त्वाचा उपनगरी प्रकल्पच नाही तर ते एक असे ठिकाण आहे जिथे मिरा रोड मुंबईतील आयुष्य कसे असले पाहिजे याची एक व्याख्या आहे, असे ते म्हणाले.
एस्सेल वर्ल्डपासून सुमारे २.५ किमी अंतरावर आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ असलेल्या मिरा रोडला एक स्थानक आहे आणि अनेक बसमार्ग आहेत जे मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्याशी जोडतात. नॅशनल पार्क, ख्यातनाम रूग्णालये, शॉपिंग सेंटर्स, सिनेमॅक्स, हायस्कूल आणि महाविद्यालये असलेले मिरा रोड हे स्वयंपूर्ण शहर आहे आणि शहरी जीवनाला सुंदर वातावरणाशी जोडणारे आहे. साधनसुविधांचा विकास आणि वाढ होत असताना अनेक उद्योग आणि कंपन्या येथे स्थापित करण्यात आल्या आहेत आणि त्यातून या विभागात नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.