अमेरिकेतील एका एरोस्पेस उत्पादकाच्या कारखान्यात भीषण आग लागली. मंगळवारी स्थानिक शाळा बंद ठेवाव्या लागल्या यावरून आगीची तीव्रता किती होती याचा अंदाज येतो. स्थानिक रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले. वृत्तसंस्था एपी ने दिलेल्या वृत्तानुसार, ही आग फिलाडेल्फियाच्या उत्तरेला लागली.