रक्षाबंधनाच्या दिवशी महाराष्ट्र सरकारकडून अनेक बहिणींना आनंदाची बातमी मिळाली आहे. लाडकी बहिण योजनेचा हप्ता ८ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील लाखो महिलांना आनंदाची बातमी मिळाली आहे. जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.
रक्षाबंधनसारख्या विशेष सणाच्या पूर्वसंध्येला ही रक्कम उपलब्ध झाल्याने महिलांमध्ये विशेष उत्साह आहे. या रकमेमुळे अनेक महिला घरखर्च, मुलांचा शिक्षण खर्च आणि सणासाठी आवश्यक खरेदी करू शकतील. यावर्षी रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी येत आहे. त्यामुळे ८ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात लाडकी बहिन योजनेचा हप्ता जमा होईल.
या संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. यासह, रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक बहिणींना सरकारकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. हा सण अनेक बहिणींसाठी गोड असणार आहे.