कंडक्टर म्हणाला, “जेव्हा मी म्हणालो की मला मराठी येत नाही, तेव्हा त्या महिलेने मला शिवीगाळ केली आणि म्हणाली की मी मराठी शिकले पाहिजे. अचानक मोठ्या संख्येने लोक जमले आणि त्यांनी कंडक्टरवर हल्ला केला.पोलिसांनी सांगितले की, जखमी बस कंडक्टरला बेळगाव मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली असून तो धोक्याबाहेर आहे,
कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी चालक भास्कर जाधव यांच्या चेहऱ्याला काळे फासले आणि त्यांच्यावर हल्ला केला, असे मंत्र्यांनी सांगितले. कर्नाटक सरकार या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत बस सेवा पुन्हा सुरू केली जाणार नाही, असे सरनाईक म्हणाले.या प्रकरणामुळे शनिवारी बेळगावहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.